अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील गजानननगरात सेवानिवृत्त महसूल मंडळ अधिकारी शांताराम फसाले यांच्या घरी दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली. फसाले पत्नीसह देवदर्शनाला गेले असता, अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल २४,५०० रुपये रोकड चोरून नेली. घरी परतल्यावर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या गाडीतून पळताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. फसाले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे?

