सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्या ह्या मागील नऊ वर्षापासून दात्यांच्या मदतीने सतत वेगवेगळे उपक्रम राबवून गरजवंताना मदत करीत असतात..
“माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन या उपक्रमाकरिता, व्हाट्सअप च्या दहा वेगवेगळ्या ग्रुपच्या जवळपास चार हजार जुळल्या गेलेल्या सदस्यांना मदतीकरिता कुठलीही मदत किंवा कोणताही सण असो. ताबडतोब जेवढी मदत मागितली तेवढी रक्कम या माध्यमातून जमा होते. रक्षाबंधनला काही दिवस असतानाच माणुसकीची भिंत कडून व्हाट्सअप ग्रुप वर रक्षाबंधनच्या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या अंदाजित खर्चाबद्दल तीस हजार रुपये जमा करण्या करिता आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व अवघ्या तीन दिवसामध्ये एकेचाळीस हजार चारशे चार रुपये जमा झाले.
माणुसकीची भिंतिच्या महिला सदस्यांनी तीस हजार नऊशे अठरा रुपयांचे आपल्या गरजवंत भावासाठी टॉवेल टोपी धोतर, कपडे व पाऊसा पासून रक्षण करण्या करिता छत्र्यांचं वाटप करण्यात आले आणि सदस्यांच्या निराधार गरजवंत बहिणींसाठी साडी,लुगडे व राख्याची खरेदी करण्यात आली…
भरल्या कुटुंबापासुन दुर झालेल्या वृद्धाना कुठले आले रक्षाबंधन.मात्र माणुसकीची भिंतचे सदस्य, महिला सदस्या व दात्यांच्या मदतीने दरवर्षी न चुकता रक्षाबंधन हा सण गरजवंतांसोबत साजरा करण्यात येतो. याही वर्षी रक्षाबंधन या सणानिमित्त महिला सदस्यांनी बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड पुसद येथे सकाळीच जाऊन वृद्धाश्रमाची स्वच्छता केली. रांगोळ्यांनी अंगन सजवून, वृद्धांना मोठ्या मायेने पाटावर बसविण्यात आले. त्या नंतर त्यांचा पेढा, टोपी, टॉवेल, धोतर व छत्री भेट दिल्यानंतर राखी बांधून त्यांना ओवाळण्यात आले. रक्षाबंधन झाल्यानंतर पोळी, भात, वरण भाजी, व बर्फीचे मायेने जेवण दिले. त्याचबरोबर फळे,बिस्कीट देऊन रक्षाबंधनाचा सणमोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर लगेच माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच पुसद मधील बांधवांना गरजवंत महिलां सदस्यांनी राखी बांधली व त्यांना टावेल टोपी पेढा देऊन ओवाळले. शेवटी माणुसकीची भिंत सदस्यांनी रुग्णालयात भरती असलेल्या महिलांच्या हाताने राखी बांधून घेतली व त्यांना ओवाळणी स्वरूपात साडी लुगडे दिले व सर्वांना गोड जेवण देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला.पुसद परिसरातील जवळपास तीनशे गरजवंतासोबत हा सण साजरा करण्यात आला.
या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाचे पुसद परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमा करिता माणुसकीची भिंत सोशल फॉउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव,सौ. मोनिका जाधव त्याचप्रमाणे सर्वश्री संतोष गावंडे, पंजाब ढेकळे, अनंता चतुर,पंकजपाल महाराज,प्रभाकर पाटील,सोहम नरवाडे,आकाश शिंदे, मधुकर चव्हाण, मंगेश भगत, अरुण नागुलकर ,शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे,श्रीमती मंजुषा डेकाटे, श्रीमती शैलाताई सावंत,सौ.प्रतिभाताई कुशवाह, सौ. अल्का आघाम,डॉ.प्रणालीताई इंगोले,आनंद जाधव,ओम पंडितकर, प्रमिलाताई खंदारे, ज्ञानेश्वर राऊत,रूपालीताई नरडे, प्रशांत लासिनकर,सुरेश रोकडे,सचिन देशमुख,विनायक शेवकर, यशवंत देशमुख,रमेश डंबोळे, संदेश पवार, दिनकर दमकोंडावार,धनंजय चापके, अमोल धोबे,विनीत उदावंत, शैलाताई सुरावर, श्री बंग, मधुकर भानावत,संजय आसोले, प्रदीप निलावार,प्रेमभाऊ राठोड, निवृत्तीनाथ बैस्कार,गोपाल सुरोशे,मिलिंद बोबडे,रणजीत गायकवाड ,अविनाश मुखरे, सागर भागवत,विनय चक्करवार, अनिल मुडे,निशांत देऊळकर, सचिन भिताडे ,मंथन कदम, रेखाताई आगलावे,पूजाताई इंगोले,प्रियंका बेले, गौरव नाईक, सुरेखा मोगरे,संतोष हराळ, वैभव गोभे,अतुल व्यवहारे ,रवी उबाळे, जयसिंग राठोड,चंदाताई अग्रवाल,मधुकर चिंतावार,अमोल व्यवहारे,महेश हंबर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते…

