अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित दादा गट ) च्या जिल्हाप्रसिद्धीप्रमुख पदी राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते अनिल मालगे यांची नियुक्ती आज राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनिल पाटील , आमदार अमोल दादा मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदुजमा यांनी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करून नियुक्तीपत्र वाटप केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अनिल मालगे यांची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली अनिल मालगे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया मध्ये कार्य करणारे व सर्वांशी प्रेमळ स्वभाव ठेवून राहणारे , अजित दादा वर असलेली एक निष्ठा लक्षात घेता त्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल दादा मिटकरी ,जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदुजमा, महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभाताई अवचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष काशीराम साबळे, यांच्यासह पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित होते
यावेळी अमोल दादा मिटकरी यांनी अनिल मालगे हे पक्ष सोबत एकनिष्ठेने कार्य करीत आले असल्याचे यावेळी म्हटले अनिल मालगे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय आमदार अमोल दादा मिटकरी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदुजमा, महीला जिल्हाध्यक्ष सौ. प्रतिभाताई अवचार, व बिडकर परिवार यांना दिलेअनिल मालगे यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशी माहिती गणेश भुजबले यांनी दिली.

