कंधार प्रतिनिधी:-ज्ञानेश्वर कागणे
एक राखी सैनिकासाठी…!
देशाच्या संरक्षणासाठी…..!!
रक्षाबंधन राखी पौर्णिमेनिमित्त रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा कंधार येथे.
एक राखी सैनिकांसाठी …!
देशाच्या संरक्षणासाठी ….!!
हा उपक्रम राबवण्यात आला
यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड, कर्तव्यावर असलेले भारतीय जवान मधुकर राठोड,माजी सैनिक पोचीराम वाघमारे, माजी सैनिक गोविंदराव सूर्यवंशी, माजी सैनिक बाबुराव कल्याणकर या भारतीय जवानांना विद्यालयातील शिक्षका भगिनी व विद्यार्थिनीनी राखी बांधून देश संरक्षणाबद्दल. कर्तज्ञता व्यक्त केल्या.
या स्तुत्य उपक्रमाला मला उपस्थित राहता आले. याचं मी भाग्य समजतो. यावेळी कार्यक्रमास आयोजक संस्थेचे सचिव ॲड.गंगाप्रसाद यनावार ,पत्रकार शुभम केंद्र, ॲड.सागर डोंगरजकर ,मुख्याध्यापक सुभाष मुंडे ,सहशिक्षक रोहिदास सूर्यवंशी ,एकनाथ तिडके ,राजू होंडाळे ,तारकेश तपासे, सौ. मंजुषा यंन्नावार, शेख यासमीन,यांची उपस्थिती होती , यावेळी सैनिक व माजी सैनिकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भारतीय जवान मधुकर राठोड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या….

