कभी खुशी कभी गम
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद तालुक्यात सकाळ पासूनच पाऊसाची हजेरी लागली असून जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे काही ग्रामिण भागात मध्यम तर काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस सुरु असून शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होत असतांना दिसत आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे सोयाबीन कापूस या सारख्या पिकांना फटका बसणार असल्याचे समझते काही ठिकाणी पिक खरडून गेले आहे तर बऱ्याच ठिकाणी चांगला शेती पूरक पाऊस पडला आहे तसेच शहरात काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे

तर काही घरांची पडझड झाली आहे एन रक्षाबंधनच्या दिवसी असा अवकाळी पाऊस पडत असून शेतकरी व नागरिकांना फार मोठा मनस्ताप होत आहे पुसनदी ला पुर आला असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

