मराठवाडा विभाग प्रमुख :-(शुभम उत्तरवार)
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी लोहा शहरातील श्री दत्त संस्थान देऊळगल्ली येथे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त "ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण" सप्ताहाचे आयोजन केले असल्याची माहिती श्री दत्त संस्थानकडून देण्यात आली.
सर्वश्री हभप लक्ष्मीकांत महाराज लोहेकर, हभप भालेराव गुरुजी महागावकर, हभप आत्माराम महाराज रायवाडीकर, ह.भ.प. चंद्रकांत महाराज कनकदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्ती श्रावण शुद्ध. १५ (पौर्णिमा) रोज शनिवार दि. (९) आगस्ट २०२५ पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास आरंभ होत आहे.दि. १६ आगस्ट २०२५ रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प. गुरुवर्य लक्ष्मीकांत महाराज लोहेकर यांचे होणार आहे.तद्नंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व भावीक भक्तांनी या पारायण सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या सुवर्ण महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन, श्री दत्त संस्थान देऊळगली, लोहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

