कंधार प्रतिनिधी, ज्ञानेश्वर कागणे
कंधार व लोहा तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय मुला मुलींची शिक्षणासाठी होणारी हेळसांड पाहुन या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार व लोहा येथे नविन शासकिय वसतिगृहाची मान्यता मिळवुन दिली आहे.
ग्रामिण भागातील शिक्षणासाठी येणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षनिय असुन त्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकानी येणे आवश्यक आहे.
माञ निवास व भोजनाची सुविधा अभावी अनेक विद्यार्थी मुले मुली शिक्षणापासुन वंचित राहात असलेले पाहुन या मतदार संघाचे विकास पुरुष आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मागासवर्गीय मुलां मुलीसाठी कंधार व लोहा येथे नविन शासकीय वसतिगृह स्थापनेची विनंती महाराष्ट्र राज्य सामिजिक न्याय विभागाकडे केली होती .
या राज्याचे सामाजिक न्यायमंञी संजय शिरसाट यांनी तात्काळ कंधार व लोहा येथे नविन शासकीय वसतिगृहास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंधार व लोहा तालूक्यातील ग्रामिण भागातील गोरगरीब मुल मुलीं आता शहरात येवुन शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे.



