कंधार प्रतिनिधी, ज्ञानेश्वर कागणे.
श्रीक्षेत्र उमरज (धाकटे पंढरपूर) ता. कंधार येथे श्री संत सदगुरू नामदेव महाराज जन्मोत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शनिवार, दि.९ ऑगस्ट ते शनिवार, १६ ऑगस्ट दरम्यान, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज पहाटे ४ ते ६ दरम्यान काकडा भजन, सकाळी ७ ते ९ श्री संत नामदेव महाराज ग्रंथ परायण, सकाळी १० ते दुपारी १२ गाथा भजन, दुपारी १२ ते ३ श्रीमद् ? भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन व हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. यावेळी भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. कृष्णा महाराज धानोरकर हे राहणारआहेत.
शनिवार, दि.९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज धानोरकर, रविवार, दि.१० ऑगस्ट रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज करंजीकर, सोमवार, दि.११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सोपान महाराज सानप.हिंगोलीकर, मंगळवार, दि.१२ ऑगस्ट रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर, बुधवार, दि. १३ ऑगस्ट रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बावस्कर, गुरुवार, दि.१४ ऑगस्ट रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे.
दि. १५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज नवले पैठणकर, मुक्ताईनगर आदी कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

तर शनिवारी, दि. १६ ऑगस्ट रोजी श्री संत, महंत, मठाधिपती एकनाथ महाराज उमरजकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
यावेळी बोरी खुर्द, दगडसांगवी, कदमाचीवाडी, मजरेसांगवी, बाबळगाव ,वागदरवाडी, माळाकोळी ,नागदरवाडी, आनंदवाडी, जांभळवाडी, संगमवाडी ,शेकापूर, तळ्याचीवाडी ,पाताळगंगा ,पळसवाडी, गंगनबीड,विविध गावातील गायनाचार्य, मृदंगाचार्य व भजनी मंडळी उपस्थित राहणार आहे.
हरिपाठाचे नेतृत्व श्री संत नामदेव महाराज वारकरी संस्था, उमरज करणार आहे.
या विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती श्री संत, महंत एकनाथ महाराज उमरजकर यांनी केले आहे.
दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ वाजता श्री ओम नमो नामदेवाय नम या महामंत्राचा सव्वा लाख नाम जप होणार आहे. रात्री १० ते १२ दरम्यान श्री गुरु नामदेव महाराज यांच्या समाधीचा महाअभिषेक व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी या सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार आहे.



