दाखल करण्यात आले शहापूर तालुक्यात विठ्ठल धरवणे शहापूर तालुक्यातील काही रेशन दुकानांमध्ये भेसळयुक्त तांदूळ मिळत असल्याची तक्रार रेशन धारकांनी केली होती या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सहादी छवा संघटना शहापूर तालुक्यात अध्यक्ष प्रसाद भोईर पत्रकार दिनेश गायकर व पत्रकार दीपक विशे यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली या वेळी तहसीलदारांनी सांगितले की रेशन दुकांनांमध्ये वितरित होणारा तांदूळ न्यूटीलाईज तांदूळ आहे
हे तंदूरच्या तुकड्यांपासून किंवा कॉर्न गहू कांदा स्टार्च यांपासून बनवले जातात यामध्ये आयर्न लोह फोलिक ऑसिड व्हिटॅमिन B 12 कधी कधी झिंक व्हिटॉमिन A कॅल्शियम इ पोषकतत्वे मिसळली जातात या तांदळामध्ये काही दाणे पांढरेसर किंवा वेगळ्या रंगाचे दिसतात त्यामुळे तो भेसळयुक्त वाटतो मात्र हा तांदूळ पूर्णपणे सुरक्षितआहे हे तांदूळ पोषकतृप्त असून या तांदळाच्या सेवनाने अनीमिया कमी होतो न्यूटीलाईज तांदळाच्या नियमित वापर रक्तातील हिमोग्लोबिन पातळी वाढविण्यास मदत करतो मानसिक विकासास मदत तांदळामध्ये जीवनसत्त्वे खनिजे असल्यानं शरीरास आणि मेंदूला आवश्यक पोषण मिळते गर्भवती महिला व बालकांसाठी उपयुक्त विशेषतः गर्भवती महिला आणि लहान बालकांसाठी या तांदळाचे सेवन पोषण पुरवते ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो भारत सरकारने 2021 पासून हा तांदूळ कुपोषण कमी करण्यासाठी रेशनद्वारे देण्यास सुरुवात केली आहे FSsAI च्या मानकांनुसार तो प्रामाणित असून नागरिकांनी काळजी न करता वापर असे आव्हान तहसीदारांनी केले
प्रतिनिधी सगीर शेख खर्डी

