अकोला प्रतिनीधी :- गणेश वाडेकर..
सराफ व्यावसायिकाची सुमारे २५ लाख ४७ हजारांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षापासून विश्वासू म्हणून काम करणाऱ्या कारागिरानेच हा विश्वासघात केला.
सुधीर देशमुख यांच्या दुकानात मुक्तीपद शरद मन्ना हा कारागीर म्हणून २००३ पासून काम करत होता.
८ जून २०२५ रोजी देशमुख यांनी मन्ना याच्याकडे २५१. ५२ ग्रॅम शुद्ध सोने दागिने तयार करण्यासाठी दिले होते.
१० जुलैपर्यंत दागिने परत दिले नाहीत. नंतर २६ जुलैपासून त्याचा मोबाईल बंद येऊ लागला. चौकशी केली असता मन्ना मूळगावी इंदूरला परत गेल्याचे समजले…

