प्रतिनीधी: – सुनील वर्मा
लोणार विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश मिळवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आदेश भाजपा चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी रविवारी (दि.03) पक्षाच्यावतीने आयोजीत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात दिले.
शहरातील बनमेरू कॉलेज च्या जुन्या बिल्डिंग मध्ये घेण्यात आलेल्या या मेळाव्याला माजी जिला अध्यक्ष गणेश मांटे ,प्रकाश गवई, दत्ता पाटील, विजय पवार, चंद्रकांत बरदे, संतोष काळे,चक्रधर लांडे यांच्या सह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिंदे यांनी तडाखेबंद भाषणातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले. त्यांच्या या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. याप्रसंगी व्यासपीठावर जीलाअध्यक्षा सह विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी शिंदे म्हणाले, की ही केवळ पदाधीकारी व कार्यकर्ता बैठक नसून, पक्षाच्या नव्या वाटचालीची सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक कार्यक्रम लागत आहे ,ह्या मध्येआगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकसंघ काम करणे गरजेचे असल्याचे सांगत या निवडणुकाबाबात रणशिंग फुकले
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षांनी एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल, असा फेक नरेटिव्ह सेट केला होता.
त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना यासह शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमुळे राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा सांगतीला.विरोधक फक्त टीका करत बसतात, पण आम्ही काम करून दाखवतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर पुढे जात असून, आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या मेळाव्यात शिंदे यांच्या उपस्थितीत शहरा सह ग्रामीण भागांतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष, युवा आघाडीचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामुळे लोणारमध्ये भाजपा ची ताकद वाढली असल्याचे दिसून आले.
शहर अध्यक्ष पदी शुभम बनमेरु तर तालुका कार्याध्यक्ष पदी गजानन मापारी
यावेळी शहरातील व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांच्या पाठिब्याने शहर अध्यक्ष पदी शुभम बनमेरू यांची फेरनिवड करण्यात आली तर तालुका अध्यक्ष निवडी पासून पक्षावर नाराज असलेले गजानन मापारी यांची तालुका कार्यध्यक्ष पदी म्हणून निवड करण्यात आली.

