महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सर्पविज्ञान आणी पर्यावरण मोहिम जिल्हाभर….

विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
साप हा अनादी काळापासून मानवाच्या जिवणात स्थान मिळविलेला वन्यजीव आहे सापांचे शिल्प अनेक देव देवतांच्या , मुर्त्यामध्ये शिल्पांमध्ये आहे उदा.शंकरजीच्या गळ्यात साप दिसतो,गणपतिच्या पोटावर अंलकाराच्या स्वरूपात साप दिसतो तर मग महाकाली वा अनेक देवीदेवतांच्या बाहू वर साप दिसतो तर चरक संहिता,संहिता सुश्रुत, महाभारत अशा अनेक ग्रंथामध्ये सापांचा उल्लेख आलेला आहे, जगात व भारतभर अनेकांच्या घरी वर्षभर सापांची पुजा केली जाते

,सर्पकन्या,नागकन्या,नागालोक, नागवंशीय असे संदर्भ राजे रजवाडे यांच्या काळातील संदर्भ आढळतात,त्यावर अनेक सिनेमा कथा कांदबरी लिहल्या गेलेत अनेक गावांची नावे हि सापांच्या नावावर पडलीत सापोतारा,हे नाशिक जवळील हिलस्टेशन आहे जिथे खुप साप निघायचे,नागव्दार जिथे साप जायच्या वाटेवर झोपून असतात अशी आख्यायिका आहे तर नागपूर हे नागवंशीय लोकांची राजधानी होती असा संदर्भ मिळतो त्यामुळे एम्प्रेस मिल चे व महात्मा फुले मार्केट चे बोध चिन्ह हे दोन फनीधारी नागांचे आहे त्यामुळे भारतीय संस्कृतीत सापांचे महत्व अन्यन आहे त्यामुळे प्रतीनिधीक स्वरूपात सापांची पुजा नागपंचमीच्या दिवशी केली जाते असे मत विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक,सर्प अभ्यासक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले
नागपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्षभर शाळा महाविद्यालये, ग्रामीण भागात सर्प विज्ञान आणि पर्यावरण याविषयी प्रबोधन व जनजागरण मोहिम राबविते याचाच भाग म्हणून या अभियानाची अन्तर्गत न्यू इंग्लिश प्राथमिक शाळा,न्यू इंग्लिश काॅनव्हेन्ट, आणि न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळांमध्ये सर्पविज्ञान व पर्यावरण हा कार्यक्रम घेतला गेला यावेळी मंचावर प्राचार्य मा अनघा आगवण, मुख्याध्यापक मा अमृतकर सर, मा. मुख्याध्यापक गावंडे मॅडम , पर्यवेक्षक मा पुष्पा फरकाडे मॅडम मंचावर उपस्थित होते यावेळी प्रोजेक्टर च्या माध्यमातून लाईव्ह पध्दतीने विषारी बिनविषारी सापांची माहिती, विषारी सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार वैद्यकीय उपचार,सापाबद्ल असणारे गैरसमज, अंधश्रद्धा,मानवी जिवनात आणि पर्यावरणात सापांचे असलेले महत्त्व आदी बाबत माहिती देवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा लता मोकलकर यांनी केले तर प्रास्ताविक मा प्राचार्या अनघा आगवण यांनी तर आभारप्रदर्शन मा मुख्याध्यापक अमृतकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिनही शाळा, महाविद्यालय यांचे शिक्षक, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास १६०० च्या वर विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.

