_कंधार नगरपरिषद पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांने दि.१३ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण करण्याचे दिले निवेदन.._
कंधार प्रतिनिधी -ज्ञानेश्वर कागणे
कंधार नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन ६ महिने १५ दिवसांचे रखडले आहे.कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला समोर जावे लागत आहे. कंधार नगरपरिषद पाणीपुरवठा रोजंदारी कर्मचारी यांचे ६ महिने १५ दिवसांचे थकीत वेतन न मिळाल्यामुळे दि.१३ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण करीत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी कंधार,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कंधार,तसेच माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुकूलबाड यांना दिले आहे,मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या ठरत आहे.कर्जाचे हप्ते लांबणीवर पडून व्याजाचा भुर्दंड बसतो.
नियमित खर्चात अडचणी,अडथळे येत आहेत. सन २०२१ ते २२ मधील ६ महिने १५ दिवसांचे थकीत वेतन असुन आज पर्यंत आम्हाला वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आमच्या व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.यामुळे आम्हाला आमचा घर गाडा चालविण्यासाठी कुठलंही आर्थिक उत्पन्न दुसरे राहिले नाही. आणि ६ महिने १५ दिवसांचे वेतन थकीत असल्याने आम्ही मेटाकुटीला आलोत असे कंधार नगरपरिषद कर्मचारी यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बंडू मंगनाळे,नागेश पवार,बालाजी निकम,बळीराम कंधारे,अनिल हकदळे,कैलास भिसे,नारायण लुंगारे,कल्याण वाघमारे,अभिजीत कांवळे,परमेश्वर चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी,सय्यद ईसाक,केदार बोरकर,बालाजी गित्ते,बालाजी घोडजकर,भिमराव गित्ते,हणमंत लुगारे,रत्नाकर जाकापुरे,राहुल कदम,शिवाजी लुंगारे,निवेदनावर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,

