रायगड जिल्हा प्रतिनिधी:- कैलासराजे घरत
“तिसऱ्या युनिटला परवानगी म्हणजे साक्षात पेणच्या जनतेला मृत्यूच्या दारात ढकलणे..
“जेएसडब्लू कंपनी डोलवी कंपनीने डोलवी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेतल्या आणि नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात ते आश्वासन आजपर्यंतपूर्ण केले नाही. खरं तर नोकर भरती करताना स्थानिक भूमिपुत्रांना ८० % नोकरीत प्राधान्य देणे गरजेच आहे असे असताना बाहेरील युपी,बिहार, कर्नाटकचे कामगार मोठ्या प्रमाणात भरती केलेले आहेत. प्रत्यक्षात हा प्रकल्प निप्पॉन या कंपनीचा इस्पात चा प्रकल्पजपानचा आहे कालांतराने तो पुढे JSW ने विकत घेतला.कामगार बाहेरचे आणि त्रास डोलवी वडखळ परिसरातील स्थानिक नागरिकांना. या प्रकल्पातील निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील सुपीक जमिनी नापीक झाली आहे तसेच पारंपारिक मच्छीमारी व्यवसाय संपुष्टात आला आहे.

अगोदरच या प्रकल्पामुळे डोलवी वडखळ परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात असताना हा जीवघेणा प्रकल्प विस्तारित करून संपूर्ण पेण तालुक्यातील जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात येथील जीवनमानावर निर्माण होणारे परिणाम याचा विचार न करता स्थानिक लोकप्रतिनिधी, एजंट यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन अगदी पद्धतशीरपणे या प्रकल्पाची पाळेमुळे दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिवाय कंपनीतील उच्च अधिकारी लोकप्रतिनिधी, कॉन्ट्रॅक्टर पेणमध्ये आलिशान बंगला, फ्लॅट मध्ये राहतात. त्यांना जनतेच्या त्रासाचे काहीएक पडले नाही.पेणच्या जनतेच्या जीविताशी खेळण्याचे पाप करीत आहेत.तरी सुज्ञ नागरिकांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या कोक ओव्हन प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आयोजित जनसुनावणीलामोठ्या संख्येने उपस्थित राहून जास्तीत जास्त हरकती घेऊन या कोक ओव्हन प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला विरोध करूया असे आवाहन ॲड.तन्मय पाटील यांनी केले आहे.या कंपनीचा मुख्य प्रोडक्ट म्हणजेच लोखंडी कॉइलज्या बनविण्यासाठी लोखंडी रॉ मटेरियल ब्लास्ट फर्नेस मध्ये वितळवून त्यापासून तयार करतात.लोखंड वितळवीत असताना गंज मिश्रित धूर हवेत मिसळला जातो. हा धूर श्वासोच्छद्वारे आपल्या फुफ्फुसात जातो त्यामुळे फुफ्फुसाचे अनेक दुर्धर आजार होऊ लागले आहेत. JSW कंपनीतील धुराच्या प्रदूषणामुळे अनेक शारीरिक आजार होत आहेत ज्यात प्रामुख्याने कॅन्सर, श्वसनसंस्थेशी संबंधित आजार दम्याचा विकार, ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग, त्वचेचे विकार त्वचेला खाज येणे. धुरामुळे ऍलर्जी होऊन डोळ्यांची जळजळ नाक चोंदणे, शिंका येणे किंवा नाक वाहणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. JSW कंपनीतून निघणारा लोखंड गंज मिश्रित धूर हवेत न सोडता अद्ययावत बंद स्पिंकल प्लॅन टाकल्यावर हवेतील प्रदूषण नियंत्रणात येईल. पण यासाठी राजकीय लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती हवी. त्यांचे नियंत्रण हवे तरच हे शक्य होईल.

