विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
वर्धा नगर परिषद मुख्याधिकारी आणि शहरातील फुटपाथवरील दुकानदार यांच्यात आज सकारात्मक बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर या बैठकीत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला.
मुख्याधिकारी महोदयांनी दुकानदारांचे म्हणणे ऐकून घेतले व दोन्ही पक्षांमध्ये परस्पर सहमतीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नियोजित जागेत दुकानांसाठी ठराविक जागा, शिस्तबद्ध मांडणी, व वाहतुकीस अडथळा न होईल याची हमी अशा अटींवर अतिक्रमणाचा प्रश्न निकाली काढण्यात आला.
दुकानदार प्रतिनिधींनी निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. या निर्णयामुळे फुटपाथ दुकानदारांना दिलासा मिळाला असून शहरातील वाहतूक आणि स्वच्छतेचाही प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

या सोबतच फुटपाथ दुकानदारांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या
युवा आंदोलक आसिफ खान यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन,
आम आदमी पार्टीने घेतलेल्या पुढाकाराच्या कारणाने आज मुख्याधिकारी आणि फुटपाथ दुकानदार यांच्यात योग्यरित्या बैठक घडून आल्याने समस्येचे निराकरण झाल्याची भावना व्यक्त करत सर्व फुटपाथ दुकानदार आणि प्रशासनाचे आभार मानले.


