राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राज्य शासनाच्या आदेशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल दिन साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर राळेगाव महसूल विभागाच्या वतीने दिं.४ ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला तालुक्यातील सातही मंडळात शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सातही मंडळातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आहे.
यात राळेगाव, धानोरा, वडकी, वाढोणा बाजार, वरध, झाडगाव व किन्ही जवादे या सातही महसूल मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात आले असून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि विविध सेवा-सुविधा उपलब्ध करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते.
या उपक्रमात पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, महावितरण, आधार केंद्र, निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, संगायो, सेतू सुविधा केंद्र, सेंट्रल बँक आणि एकात्मिक बाल विकास योजनेचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले. नागरिकांना योजनेअंतर्गत विविध लाभ देण्यात आले; जमीन पट्टे आदेश, प्रमाणपत्रे, धनादेश, दिव्यांग सहाय्य सामग्री व प्रशस्तीपत्रे यांचे वाटप करण्यात आले.

पंचायत समिती राळेगाव यांच्यामार्फत संकटग्रस्त शेतकरी योजना – ५ लाभार्थी, अपंग समावेशी सुशिक्षण योजना – १ डॉ. आंबेडकर योजना – ४ बिरसा मुंडा योजना – १, मनरेगा – ६ स्वच्छ भारत मिशन – ५, मौजा कळमनेर येथील जमीन पट्टे – ४ पशुसंवर्धन विभाग योजना – २ पुरवठा विभाग – २० रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना – २० लाभार्थी, तालुका कृषी विभागाच्या योजनांतर्गत पिक स्पर्धा – ५, कृषी यांत्रिकीकरण – ३ प्रधानमंत्री कृषी सिंचाई – २ पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी ३७ शेतकऱ्यांना घडी पत्रिका प्रदान करण्यात आले. तसेच महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, ऐपतीचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले. अर्जदारांना थेट त्यांच्या संबंधित मंडळांमध्ये हे दस्तऐवज प्राप्त झाले.
कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, सहायक गट विकास अधिकारी श्रीमती भारती ईसळ, भूमी अभिलेख उपअधीक्षक भारत गवई, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली असून या सातही
शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
तालुक्यातील सातही मंडळात शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या समाधान शिबिराला लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासनाच्या लोकाभिमुखतेचा व परस्पर सहयोगाचा प्रेरणादायी अनुभव साकार झाला असल्याचे निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी यांनी सांगितले आहे.

