वर्धा संकलन विभाग
नगरपालिका पुनरावृत्ती करण्यासाठी ठेकेदार मार्फत निष्कृष्ट दर्जाचे सामग्री वापरण्यात येत आहे सदर कारभार नगरपालिकेच्या अधीन होत असल्याने येथील प्रशासकीय अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले सदर प्रशासकीय अधिकारी तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनची कारवाई करण्यात यावे भीम आर्मी यांची सर्वश्री मागणी

नगरपरिषद पुनवृत्ती चे काम चालू असताना मागील कित्येक दिवसापासून सातत्याने भीम आर्मी द्वारा निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे माहिती व्हिडिओसह नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी यांना वारंवार सांगण्यात आले परंतु यावर काना डोळा करून नगरपालिकेची ठेकेदारासोबत हात मिळवणे झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तेव्हा नगरपालिकेतील जेथे अधिकारी वर्ग असते तेथेच इतक्या मोठ्या प्रमाणावर निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे असे भीम आर्मी तसेच गावातील नागरिकांच्या लक्षात आले याकरिता सदर वापरल्या गेलेले विटा निष्कृष्ट दर्जाचे आहे तसेच फर्निचर करिता वापरण्यात येणारी प्लायसीट हे सुद्धा कमी एम .एम. ची आढळून येत आहे सदर काम बोगस पद्धतीने होत असून लवकरात लवकर काम थांबून कामाची चौकशी करण्यात यावे व नगरपालिकेचे अधीन असलेले प्रशासकीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी त्यांच्याच देखरेखी मध्ये नगरपालिकेचे आत निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याने मुख्य अधिकाऱ्याने यावर आजपर्यंत दखल का घेतली नाही सदर नगरपालिकेतील आत मधील कामे निष्कृष्ट दर्जाचे होत असेल तर बाकी गावातील कामाचा दर्जा काय असणार हे सुद्धा आपण लक्षात घेऊन आपण संबंधित ठेकेदार तसेच मुख्याधिकारी प्रशासकीय अधिकारी यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सदर कामकाज लवकरात लवकर थांबून चौकशी करण्यात यावे सदर बाबींवर दखल न घेतल्यास भीम आर्मी द्वारा आंदोलन तसेच कामकाज थांबवले जाणार हा इशारा देण्यात आला.

या प्रसंगी निवेदन देताना रोशन हेडवे निखिल साखरे राहुल वाघमारे विकास कांबळे ज्योती नगराळे तसेच भीम आर्मी चे आदी पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

