अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
09/12/2024
मुर्तीजापूरः माना पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देऊन केला अत्याचार, दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली …
माना पोलीस स्टेशन येथे बुधवार ४ डिसेंबर रोजी १७ वर्षिय अल्पवयीन मुलगी हरविल्याची तक्रार प्राप्त होताच ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनात माना पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता तपासात आरोपी ईरशाद शहा नासीर शहा तसेंच राजा उर्फ शारीक शहा यांनी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन नागपूर व पुणे येथे वारंवार अत्याचार केला अशा पिढीतीने दिलेल्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालावरून दोन्ही आरोपी विरुद्ध माना पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


