अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
दि. ०३/०३/२०२५ रोजी फिर्यादी प्रमोद रामकृष्ण नंदागवळी, वय ५४ वर्षे रा. गाजीय मश्जीद जवळ, तारफैल, अकोला यांनी पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे जबानी रिपोर्ट दिला की, दि. ०२/०८/२०२५चे २१/१५ वा ते २१/३० वा दरम्यान फिर्यादी यांनी त्यांचे पुतण्याचे नावावर असलेली लाल रंगाची यामाला FZS कंपनीची मोटार सायकल कं MH-30-BM-0868 कि.अं. ८०,००० रू ची ही झी महासेल समोर, गांधी रोड, अकोला येथे उभी करून कपडे खरेदी करण्यासाठी गेले असतांना कोणीतरी अज्ञात ईसमाने सदरची मोटार सायकल चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे अप कं. २३८/२०२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे तपासात पो.स्टे. सिटी कोतवालीं, अकोला येथील डि. बी. पथकाने अज्ञात आरोपीचा शोध घेवुन व तांत्रीक तपास करून सदर गुन्हयात आरोपी नामे रोहीत उमेश जावळे, वय २३ वर्षे रा. कैलास टेकडी, सिंधी कॅम्प, अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडुन वर नमुद गुन्हयातील चोरी गेलेली यामाला FZS कंपनीची मोटार सायकल कं MH-30-BM-0868 कि.अं. ८०,००० रू ची ही जप्त करण्यात आली आहे. तसेच आरोपीकडुन चोरीचे ईतर खालील वर्णनाचे मोटार सायकली जप्त करण्यात आले आहे.

