अनेक ठिकाणी जनावरे चोरीला गेल्याच्या घटना समोर येत आहेत…..
शहापूर तालुका प्रतिनिधी – कैलास शेलवले
ठाणे- शहापूर तालुक्यातील खर्डी स्टेशन परिसरात मोकाट गुरे चोरणारी टोळी सक्रिय 5-6 जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन चोरट्यांनी जनावरांना केले बेशुद्ध नागरिकाच्या सतर्कते मुळे चोरट्यांनी जनावरे न नेता केले पलायन.
या घटनांमुळे जनावरांचे मालक आणि परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.
पोलीस जनावरे चोरणाऱ्या चोरांचा तपास करत आहेत.
तसेच मालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जनावरांची चोरी झाल्यास तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करावी.

