निलेश कोकणे:-सातारा जिल्हा प्रतिनिधी
खातवळ (ता. खटाव जिल्हा सातारा ) सनंद_वस्ती येथील श्री.गणेश मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सपत्नीक उपस्थित राहून मंदिरात साकारलेल्या नूतन प्राणप्रतिष्ठित श्री गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ भाविकांशी संवाद साधला.
मंदिर परिसरातील सभामंडप तसेच खातवळ गावच्या विकासकामांसाठी मागणी केलेल्या निधीचे प्रस्ताव मंजूर करून तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन यावेळी मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी दिले. तसेच या भागातील टेंभू योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असून पुढील काळात अजूनही या भागात अनेक विकासकामे करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित सर्वांनाच या श्री गणेश प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या व या भागातील विकासकामांसाठी कधीही निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी दिली.
यावेळी माण खटाव विधानसभा भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले, युवानेते विशाल बागल, राज्य उपकरआयुक्त सुनील फडतरे साहेब, ठाणे नायब तहसीलदार गोरख फडतरे साहेब, देवानंद फडतरे, नंदकुमार फडतरे, तानाजी बागल, प्रभाकर फडतरे, नवनाथ फडतरे, अंकुश बागल ,प्रमोद फडतरे ,शंकर फडतरे, सतीश फडतरे, शंकर मोरे, रामभाऊ पाटील, ईश्वरशेठ जाधव, अनिल फडतरे ,संतोष फडतरे, खंडेराव मदने,राहुल फडतरे यांसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
खातवळ (ता. खटाव जिल्हा सातारा )

