अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
धारदार शस्त्र घेऊन खुलेआम शहरात फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी जागृत नागरिकाच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. अकोल्यातील गौरक्षण रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज कारवाई केली आहे. हा आरोपी गौरक्षण रोड भागात हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून त्याच्याविरोधात कारवाई केली आहे.
सदर इसम बबलू उर्फ शंकर धनेश्वर राऊत यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून धारदार शस्त्र लोखंडी कोयता किंमत अंदाजे ५०० रुपये चा ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलिस स्टेशन खदान यांच्या ताब्यात देण्यात आले:

