कंधार दि.३ ( ता. प्र. ):- ज्ञानेश्वर कागणे
हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले महान सुफीसंत हजरत सय्यद शेख अली सांगडे सुलतान मुश्किले आसान यांच्या ५९१ व्या उर्सानिमित्त रविवार दि.३ ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात भव्य संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.या संदल मिरवणुकीमध्ये विविध जाती धर्मातील हजारो भाविक भक्तांनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले.
हजरत सांगडे सुलतान कंधार यांचे वंशज रफाई कादरी सज्जादा नशीन व सय्यद शाह अनवारुल्लाह हुसैनी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५.३० वाजता फातेहाखाणी नंतर छोटी दर्गाह मधून सुफी संत हजरत सय्यद शेख अली सांगडे सुलतान मुश्किले आसान यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
या मिरवणुकीत जिल्ह्यासह अनेक राज्यातील विविध जाती-धर्मातील हजारो भाविकांनी संदलच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती.ही संदल मिरवणूक शहरातील मुख्यमार्गावरून मार्गक्रमण करीत रात्री उशिरा दर्गाह मध्ये पोहोचली.उर्सानिमित्त छोटी दर्गाह वर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या संदल मिरवणुकी मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर,खरेदी विक्री संघ कंधारचे सभापती किशन डफडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, शहराध्यक्ष मधुकर पाटील डांगे,माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे,माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी,राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ.बाळासाहेब पवार,स्वप्निल पाटील लुंगारे,राजहंस शहापुरे,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भोसीकर,ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे,शेख असेफ आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संदल मिरवणुकीचे दर्शन घेतले.या संदल मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.


