कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
गणेश राठोड
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
मागील तीन वर्षापासून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय झालेले सेवानिवृत्त अधिकारी साहेबराव कांबळे यांच्या नेतृत्व क्षमतेची धडाडी पाहून पक्ष नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. मागील तीन वर्षापासून सतत मतदारांच्या संपर्कात राहून सर्वसामान्यांची कामे अगदी हसत खेळत करीत नावारुपास आलेले साहेबराव कांबळे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेस
पक्षातर्फे उमरखेड विधानसभेची उमेदवारी दिली यामध्ये त्यांचा थोड्याफार मतांनी पराभव झाला. पराभवानंतरही त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता कार्यकर्त्यांशी आपले आपुलकीचे नाते जोपासत पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी आणखी नव्या जोमाने आपला जनसंपर्क वाढविला सर्वसामान्यांच्या समस्या सहजपणे सोडविणारा नेता म्हणून पक्ष नेतृत्वापर्यंत आपल्या कार्यातून आगळीवेगळी छाप निर्माण करणारा नेता म्हणून साहेबराव कांबळे यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याची धडाडी पाहून काँग्रेस पक्ष नेतृत्वाने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी निवड केल्याने मनमिळावू स्वभावाचा उत्साही नेता मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे .


