रोकडे ज्वेलर्सच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न……
गडचिरोली, ०२ ऑगस्ट २०२५
नागपूर येथील रोकडे ज्वेलर्स यांच्या वतीने प्रथमच गडचिरोलीत भव्य ज्वेलरी प्रदर्शनीचे आयोजन लँडमार्क हॉटेल येथे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उद्घाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते पार पडले.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. नेते म्हणाले, “गडचिरोली हा अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अशा जिल्ह्यात रोकडे ज्वेलर्स यांच्यासारख्या प्रतिष्ठित संस्थेने दागिन्यांचे प्रदर्शन भरवले, ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली औद्योगिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळते.”

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,समन्वयक प्रमोदजी पिपरे, डॉ. नेते यांची पत्नी सौ. अर्चना नेते,रोकडे ज्वेलर्स इव्हेंट मॅनेजर शुभांगी खेडेकर, लँडमार्क हॉटेलचे मालक रहीमभाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या ठिकाणी मा.खा.डॉ. नेते यांनी पाहणी केली यात विविध प्रकारचे दागिने व आकर्षक डिझाइन्सची दागिन्यांची शृंखला पाहायला मिळाली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे ही आवाहन केले.
हे प्रदर्शन नागरिकांसाठी एक आनंददायक अनुभव ठरत असून गडचिरोली शहरात वैविध्यपूर्ण दागिन्यांची खरेदीसाठी ही एक उत्तम संधी आहे.


