मेहकर पोलिसांची कामगिरी, देशी पिस्टल, जिवंत काडतूसह हत्यारे जप्त
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील वर्मा
बुलढाणा:- मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत मोळा रोड परिसरातील जामगाव शिवारातील ले आऊटमधील टिनपत्र्याच्या शेडमध्ये दबा धरून बसलेल्या ३ दरोडेखोरांना एका देशी पिस्टल व जिवंत काडतुसासह गजाआड करीत एकुण ५१,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात होणारे मालमत्ता विरोधी गुन्हे पाहता पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मालमत्ता विरोधी गुन्हे करणा-या आरोपींची शोध मोहीम तसेच या आरोपी विरोधात कडक कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे.
या अनुषंगाने मेहकर पोलीसांनी सतर्क राहुन दरोड्याचा कट उधळून लावला आहे. ३० जुलै रोजी मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मेहकर पोलीस स्टेशन हददीत मोळा रोड परीसरात काही इसम दरोडा घालण्याच्या उद्देशाने हत्यारासह दबा धरून बसले आहेत.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका टिनपत्र्याच्या शेड मध्ये दवा धरून बसलेल्या ३ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडुन दरोडा घालण्याचे घातक शस्व व साहीत्य जप्त केले आहे. एकुण तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत इतर आरोपीचा पोलीस पथकासह शोध घेणे चालु आहे.
शेख जुनेद शेख इरफान वय २७ वर्ष व्यवसाय मजुरी रा. पैनगंगा नगर मोळा रोड मेहकर ता मेहकर जि. बुलढाणा, निखील सिध्देश्वर सोळंके वय २४ वर्ष व्यवसाय मजुरी रा. पवनसुत नगर मेहकर ता मेहकर जि. बुलढाणा, श्रीमती किरण प्रदीप चळी वय ३७ वर्ष रा कोलेश्वर नगर डोणगाव ता मेहकर असे या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्या कडून २०,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल, ५० रुपयांचे एक जिवंत काडतुस, एक लाकडी फळी ज्यावर एका बाजुने ठिकठिकाणी टोकदार लोखंडी खिळे ठोकलेले (वाहनाचे टायर पंचर करण्याचे उददेशाने), १०० रुपयांची एक हिरवी काचेची मुठ असलेलली पेचकस, एक लोखंडी चाकू, एक वक्राकार जुना वापरता कोयता, पिवळ्या रंगाची ड्रिल मशीन, नॉबलान दोरी ३०,००० रुपयांचे ३ आरोपीचे तीन मोबाईल असा एकुण ५१,१५० रुपयांचा मुददेमाल मिळुन आला आहे.
सदर कारवाई ही. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मेहकर येथील पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिराजे, पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोउपनि संदीप मेधने, पोउपनि नितीन मिड, सपोउपनि सुरेश काळे, पोहेका सुखदेव ठाकरे, पोहेका लक्ष्मण कटक, पोहेका विजय बेडवाल, पोना प्रभाकर शिवणकर, पोकों मोहम्मद परसुवाले, पोर्को इब्राहीम परसुवाले, पोर्को राजेगावकर, चापोशि संजय पहारे, चापोशि आशिष राठोड, पोकों सलीम गवळी, पोशि गणेश वैदय, पोशि समाधान आरमाळ, मपोका आम्रपाली सरकटे यांनी कारवाई केली आहे.

