राळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगांव :- शहरासह आजुबाजुच्या परीसरातील बोगस डॉक्टरांच्या प्रमाणात वाढ झाली असून या बोगस असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन दि २९ जुलै २०२५ रोज मंगळवारला राळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा राळेगाव तालुका अधिकारी यांना देण्यात आले.स्थानिक राळेगांव शहर तसेच आजुबाजुच्या खेडेगावामध्ये ब-याच दिवसापासुन काही बोगस डॉक्टर आपला व्यवसाय थाटुन बसलेले आहे.
हे भोंदु डॉक्टर खेडया पाड्यातील जनतेला काहीतरी थातुरमातुर उपचार करून अमाप पैसा घेत असल्याची तक्रार आमच्या डॉक्टर असोशियशनकडे नागरिकांकडून आलेली आहे.शिवाय यांच्या चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्ण दगावलेले आहे.आणि भविष्यात सुध्दा अशी रूग्णांच्या जिवाची हानी होण्याची शक्यता आहे तेव्हा ही बाब लक्षात घेता तालुका आरोग्य अधिकारी यांनी वेळीच लक्ष देऊन तालुक्यातील तसेच परिसरातील असलेल्या बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने राळेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे
तरी निवेदन देतेवेळी राळेगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सोमनाथ भोयर,उपाध्यक्ष डॉ.मनोज पांगुळ, सचिव डॉ.राहुल पालकर,मुख्य सल्लागार डॉ.ओम प्रकाश फुलमाळी, डॉ.कुणाल भोयर,सदस्य डॉ.अशोक थोडगे, डॉ.अश्विनी थोडगे,डॉ.श्रीकांत उजवणे,डॉ. पुरुषोत्तम उगेमुगे,डॉ.सविता पोटदुखे, डॉ.जयश्री कविश्वर,डॉ.हेमंत गांधी,डॉ.अमोल खडसे,डॉ.हेमंत गलाट डॉ.प्रतिक पांडे,डॉ.चंद्रकांत उजवणे,डॉ.निलेश शेंडे,डॉ.सागर कुलसंगे, इत्यादी डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

