अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
मुर्तिजापूर तालुक्यातील दत्ताळा गावात ३० जुलै रोजी दुपारी नैराश्यातून ३५ वर्षीय सुध्दार हरीराम पांडे यांनी घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. लॉकडाउनपासून ते सतत आजारी असून मानसिक तणावात होते. घटनेची माहिती भावाने नातेवाईक नितीन जाधव यांना दिली.
त्यानंतर पांडे यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे अंमलदार राजेश डोंगरे तपास करीत असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती १ ऑगस्ट रोजी पोलिसांकडून प्राप्त झाली.

