अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
पोलीस बार्शीटाकळी येथे दिनांक १७/१२/२०२४ रोजी पो स्टे बार्शीटाकळी हददीतील फिर्यादी यांनी जबानी रिपोर्ट दिला की त्यांची मुलगी वय १७ वर्ष १ महिणा हिला दिनांक १५/१२/२०२४ रोजी दुपारी ०३/०० वा चे सुमारास पळवून नेले आहे. अशा रिपोर्ट वरुन पो स्टे बार्शीटाकळी येथे अप नंबर ५८२/२४ कलम १३७ (२) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. व तपास स.पो.उप.नी. धनराज राउत ब न १५६३ यांचे कडे देण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपीने अत्यंत सावधगिरी बाळगुन आपले व पीडीत अल्पवयीन मुलीचे अस्तीत्य लपवीले होते.
सदर गुन्हयात सायबर पोलीस स्टेशन, अकोला चे स.पो.नी. मनिषा तायडे, पोलीस अमंलदार गोपाल ठोंबरे, कुंदन खराबे, अतुल अजने यांनी तांत्रीक तपासाव्दारे आरोपीचे ठिकाण बाबत माहिती दिली वरुन पो स्टे बार्शीटाकळी स.पो.उप.नी. धनराज राउत ब न १५६३, पो.कॉ. राजू बाभुळकर ब न १८०४, म. पो. हे. कॉ मनिषा महाजन ब न २१०१, सायबर पोलीस स्टेशन, अकोला चे पोलीस अमंलदार गोपाल ठोंबरे, कुंदन खराबे हे नांदुरा जि. बुलढाणा येथे जावुन अल्पवयीन पीडीत मुलगी व आरोपी नामे विजय मंगलसींग डाबेराव वय २३ वर्ष वर्ष रा. रा. लोहगड ता बार्शीटाकळी यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पो.उप. नी. निलेश चाटे पो स्टे बार्शीटाकळी हे करत आहे.








