कंधार प्रतिनिधी- ज्ञानेश्वर कागणे
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सन्मान देण्यासाठी भारत न्युज मराठी तर्फे दिला जाणारा ‘भारत सन्मान अवॉर्ड’ यंदा कंधार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना जाहीर करण्यात आला.
या प्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्याचे आयोजन पुणे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार विक्रम पाचपुते, प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर, भाजपा नेते एकनाथ पवार, बिगबॉस फेम घनश्याम दरवडे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देशाई, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डोंगरे, लोकप्रिय गायिका कडूबाई खरात, तसेच भारत न्युजचे महाराष्ट्र कार्यकारी संपादक राजरत्न गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय कर्तव्याच्या जबाबदाऱ्या असल्याने पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे प्रत्यक्ष सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विशेष सन्मान सोहळा कंधार पोलिस स्टेशन येथेच घेण्यात आला. या वेळी भारत न्युजचे कार्यकारी संपादक राजरत्न गायकवाड यांनी त्यांच्या हस्ते शाल, हार आणि भारत सन्मान पुरस्कारचिन्ह देऊन पीआय जाधव यांचा यथोचित सत्कार केला.
या छोटेखानी सोहळ्याला संपादक रमेश ठाकूर, कार्यकारी संपादक नर्सिंग पेठकर, उपसंपादक संतोष सोमासे, जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर कागने, तसेच पोलीस कर्मचारी गीरे, शेळके, ठाकरस, व्यवहारे, सानप आदींची उपस्थिती होती.
पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना टाळ्यांच्या गजरात शुभेछा सर्व पत्रकार बांधव व उपस्थित स्टाफ ने
दिल्या.

