गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
मुलचेरा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडीगाव टोला येथील इयत्ता पहिली ते चौथी या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी किमान एक फुट चिखलातून जावे लागते परंतु प्रशासन लक्षात घेत नाही. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी नेमका अर्थ काय आहे हि चिखलाची व्यवस्था करतात की नाही असा प्रश्न उपस्थित होतो?? विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण् ये जा करणार तरी कसे, ग्रामपंचायत आंबटपल्ली लक्ष देत नाहीत असे दिसते आहे. आमचे मुलं शाळेत जायला चिखलाच्या वाटेतून जातील काय??
जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांनी सांगितले की आम्हाला किमान ५० फुट अंतरावरुन पाइ चालतं यावं लागते आम्ही कसेही येऊ शकतो परंतु छोटे छोटे मुलं शाळेत येणार का, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रास होतो पण ग्रामपंचायत आंबटपल्ली लक्ष देत नाही,, तसेच नगरपंचायत मुलचेरा यांनी सुध्दा दुर्लक्ष करत आहेत, नागरिक तथा शाळकरी मुले सुद्धा त्रस्त झाले आहेत..
आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा त्रास होतो म्हणून विद्यार्थी संख्या घसरणीवर आहे.
या चिखलाची व्यवस्था करा अन्यथा विद्यार्थी शाळेत येणार नाही असे गावकऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे..

