राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संदर्भातले मार्गदर्शन एडवोकेट रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती चाफले (येनोरकर मॅडम) यांनी प्रास्ताविक केले प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक उमेश बुरले सर, गणेश वरुडकर, आनंद रामटेके, अमोल पाहुणे, दिपाली पारडे, प्रियंका धनालकोटवाल, पवन गलाड, राहुल सोयाम शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सापसीडी खेळून व्यसनमुक्तीचे महत्त्व समजून घेतले.मंदा तोटे व इतर सहकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.एडवोकेट रोशनी वानोडे यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

