नाकेबंदी करून, कारसह विदेशी दारू केली जप्त ….
विदर्भ विभाग प्रतिनीधी: -युसूफ पठाण
पोलीस ठाणे वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे नाईट गस्त करीत असताना त्यांना खास मुखबीरमार्फत खबर मिळाली की pulfail वर्धा येथे राहणारा सौरभ मानवटकर हा त्याचे साथीदारसह फोर व्हीलर कारने विना पास परवाना अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणार आहे अशा माहितीवरून विसावा चौक Pulfail जवळ पंच व पोलीस अंमलदारासह नाकेबंदी केली असता काही वेळाने अल्टो सिल्वर रंगाची कार ही जी एस कॉलेज कडून Pulfail मार्गे येताना दिसली कार थांबवीत असताना एक इसम अंधाराचा फायदा घेऊन मोक्यावरून पसार झाला
1.सौरभ शालीन मानवटकर वय 27 वर्ष
2. सनी सुनील गोंडाने वय 27 वर्ष
3. आशिष हरिश वासनिक वय 32 वर्ष सर्व राहणार पुलफैल वर्धा येथे हे मिळून आले.
अल्टो कार क्रमांक MH 32 सी. 1637 चे झाडती घेतली असता त्यात विदेशी दारू कीं. 22,000 रुपये म** मिळून आला व कार किंमत 2,00,000 रुपये असा 2,22,000 रुपया चा माल जप्त करण्यात आला.
वरील नमूद तीन आरोपी व फरार आरोपी हिमांशू छगनकर रा. पूलफैल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांचे मार्गदर्शनात गुणे प्रगटीकरण पथकाचे पोउनि शरद गायकवाड सर, गुन्हे प्रगटीकरणपथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, चालक पो.शी अभिषेक मते सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे.


