मा. मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोह्यात वृक्षारोपण…
मराठवाडा विभाग प्रमुख :- शुभम उत्तरवार

राज्याचे माजी. मंत्री व समाजाचे प्रेरणास्थान मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा शहरात आर्य वैश्य समाजाच्या वतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित समाजबांधवांच्या सहभागातून यशस्वी पार पडला.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजाच्या सामाजिक बांधिलकीचा व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सकारात्मक संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सुस्थितीत पार पडलं असून उपस्थितांनी सुधीरभाऊंना शुभेच्छा देत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, बांधकाम समिती उपाध्यक्ष सूर्यकांत कोटगिरे, जिल्हा सदस्य नितीन कोंडावार, उद्योजक तुकाराम कोटलवार, प्रशांत पातेवार, बालाजी कोटगीरे, विजय कटकमवार, तसेच दिपक रूद्रवार, राम वट्टमवार, बंडू कटकमवार, नागेश दमकोंडवार, चंद्रकांत कोंडावार, स्वप्निल दमकोंडवार, विकास कोटलवार, अमोल मोटरवार, स्वप्निल कोटगिरे, मनोज महाजन, भुषण दमकोंडवार, अनिल वट्टमवार, पंकज कोटगिरे, कृष्णा रुद्रवार, हर्ष पोपशेटवार, ऋषिकेश तेललवार, गौरव दमकोंडवार, वेदांत कोंडावार यांच्यासह मोठ्या संख्येने आर्य वैश्य समाजाचे सदस्य उपस्थित होते.


