अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
मुर्तीजापुर तालुक्यातील कुरणखेड गावाचा शूर जवान नितेश मधुकर घाटे वय ३५ फाईव्ह मराठा बटालियनमध्ये सेवा बजावताना अयोध्येत २८ जुलै रोजी वीरमरण पावला. १५ वर्षांपासून सैन्यात कार्यरत असलेला हा शूरवीर गावाचा खरा अभिमान होता.
थोरल्या मुलाच्या मृत्यूनंतर आता धाकट्या सुपुत्राचाही मृत्यू झाल्याने घाटे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
३० जुलै रोजी पार्थिव कुरणखेड येथे दाखल होईल व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. अकोला जिल्हा आपल्या शूरपुत्राच्या बलिदानाला सलाम करीत आहे.


