अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
शहरातील रणपिसे नगर भागात असलेल्या जीएमडी मार्केट समोर असलेल्या ‘कप ऑफ कम्फर्ट’ नावाच्या कॅफेमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवत 29 वर्षीय तरुणाने 33 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अकोल्यातील काही कॅफेमध्ये सुरू असलेल्या ‘स्पेशल केबिन’ सुविधेमधून गैरप्रकार घडत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे?

