पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीतील अल्पवयीन फुस लावुन पळवुन नेल्या प्रकरणात अटक…
अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
दिनांक १९/०७/२०२५ रोजी पो.स्टे. तेल्हारा येथील दाखल अपराध क. २१३/२०२५ कलम १३७(२) भा.न्या.सं. मधील अपहृत मुलीला गावाकातील युवकाने फुस लावुन पळुन नेली असावी अशा शक्यतेने तपास केला असता काही मिळून येत नव्हते.
तेव्हा अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत असलेल्या पिडीतीच्या आई वडीलांनी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक मार्फत मा. पोलीस अधीक्षक सा. श्री. अर्चित चांडक सा. यांना मुलीचा शोध घेण्याची विनंती केली असता मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी एल.सी.बी. चे प्रमुख श्री. शंकर शेळके यांना पथक नेमुन समांतर तपास करून मुलीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, अकोलाचे पथकाने पिडीत मुलीचे नातेवाईक, गावातील लोक यांना विवारपुरा केली असता असे लक्षात आले कि, ०४ महिन्यापुर्वी गावातील वारकरी सप्ताह निमित्त आरोपी नामे प्रदिप दामोदार लासुरकार वय २५ वर्ष रा. तळेगाव वडनेर, ता. तेल्हारा जि. अकोला हा सप्ताहमध्ये किर्तन व पखवाज वाजविण्यासाठी आला होता, तेव्हा त्याची अपहृत मुलीसोबत ओळख झाली होती.
गोपनिय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे आरोपी प्रदिप दामोदर लासुरकार यानेच मुलीला पळून नेल्याचे निश्पन्न झाले परंतु त्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला होता. एल.सी.बी. च्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी यास रांजणगांव एम.आय.डी.सी., पुणे येथील एका फ्लॅट मधुन अटक करून अपहृत मुलीची सुटका केली.
पुढील कार्यवाहीसाठी सदर आरोपीस पो.स्टे. तेल्हारा, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी सा, जि अकोला, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील पो.उप.नि. गोपाल जाधव, पो. अमंलदार सुलतान पठाण, राज चंदेल, सतिश पवार, राहुल गायकवाड मनिष ठाकरे तसेच सायबर शाखेचे पो. अं. गोपाल ठोंबरे यांनी केली.

