राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
एसबीआय लाइफ इन्शुरन्स को-ऑपरेटिव लिमिटेडच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च “मॅनेजिंग डायरेक्टर क्लब” पदी हरीश विश्वंभर गडदे यांची निवड झाल्याबद्दल एसबीआय लाइफ इन्शुरन्स, यवतमाळ शाखेच्यावतीने दिनांक २६ जुलै २०२५ रोजी (शनिवार) राळेगाव येथील त्रिमूर्ती हॉल येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात एसबीआय नागपूर विभागाचे डेप्युटी रिजनल मॅनेजर सुमित पाटील आणि यवतमाळ शाखेचे सीबीएम मनोज राखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हरीश गडदे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित एसबीआय ग्राहकांना सुमित पाटील आणि मनोज राखे यांनी मार्गदर्शन करताना एसबीआय लाइफमध्ये गुंतवणुकीचे फायदे स्पष्ट केले. त्यांनी उपस्थितांना विश्वास व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्येच गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी तालुक्यातील अनेक एसबीआय ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

