◆ मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती…..
विदर्भ प्रमुख:- युसूफ पठाण
भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागाचा बैठक सेवाग्राम रोड स्थित चरखागृह येथे सोमवार दि. २८ जुलै रोजी संपन्न होत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस, भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसुलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, सुधिर मुनगंटीवार, मंत्री अशोक उईके, मंत्री आकाश फुंडकर, मंत्री पंकज भोयर, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, सर्व खासदार, सर्व आमदार, माजी खासदार, माजी आमदार, सर्व भाजपाच्या संघटनात्मकदृष्टा १९ जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महामंत्री, सर्व विदर्भातील मंडळ अध्यक्ष व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली समिती सह ७५० पदाधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहे.
राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वारे सुरु आहेत. सोबतच जिल्हा परिषद, नगर पालिका, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां निमित्ताने वर्धेत भाजपाची विदर्भ बैठक होत आहे. वर्धेत विदर्भातील भाजपा पदाधिकाऱ्यांची होणारी ही पहिलीच बैठक ठरणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली आहे.
समारोप कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातील ४५० शक्तिकेंद्र प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याने यात जवळपास एक हजार पदाधिकारी सहभागी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

