मराठवाडा विभाग प्रमुख :- (शुभम उत्तरवार)
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त लोहा शहरांमध्ये प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर परीक्षा ही दिनांक 27 जुलै रोज रविवार स.11.वा. कै .विश्वनाथराव नळगे विद्यालयात आयोजित करण्यात आलेली असून सदर परीक्षेसाठी1ली ते 7वी व 8वी ते 12वी. असे दोन गट असतील.
अ गटातून परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम पारितोषिक 5001रु. मिलिंद पाटील पवार (शिवसेना ता. प्रमुख), द्वितीय पारितोषिक 3001 रु. लक्ष्मण फुलवरे (अध्यक्ष चर्मकार), तृतीय पारितोषिक 2001रु. प्रसेनजीत कांबळे (B .S.F.),उत्तेजनार्थ पारितोषिक 1001रु.डि .एन.कांबळे (पत्रकार) तसेच गट ब साठी प्रथम पारितोषिक 5001 रु संतोष(बाळू दादा) संगेवार ,द्वितीय पारितोषिक 3001रु विक्रांत पा . नळगे (शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड), तृतीय पारितोषिक 2001 रु अँड.संदीप कदम, उत्तेजनार्थ पारितोषिक 1001 रु रोहित कटकमोड(सरपंच) व सर्व सन्मानचिन्हे निखिल महाबळे यांच्याकडूनअसतील.
त्याचप्रमाणे सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अनिल दाढेल (मा. नगरसेवक)यांच्या तर्फे शालेय साहित्य देण्यात येणार असून सदर प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून यश संपादन करण्याचे आवाहन आयोजक सिद्धार्थ महाबळे व प्रवीण महाबळे यांनी केलेले आहे.

