बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- सुनील वर्मा
लोणार : ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात भक्ति भावाने नटलेल्या वातावरणात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे २५ जुलै रोजी दुपारी मेहकर. लोणार मतदारसंघात आगमन होताच हजारो भाविकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेत भक्तिभावाने स्वागत केले.
याप्रसंगी काँग्रेस नेते लक्ष्मणदादा घुमरे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, उबेदभाऊ खान, विठ्ठल चव्हाण, तालुकाप्रमुख राजू बुधवत, संचालक तेजराव घायाळ, मेहकर शहरप्रमुख किशोर गारोळे, शांतीलाल गुगलिया, साहेबराव पाटोळे, समदभाई, इकबाल कुरेशी, बादशहा खान, श्रीकांत जाधव, विठ्ठल जाधव, संजय तारु, प्रविण सरदार, गजू मोरे, माजी नगरसेवक अरुण जावळे, गजानन खरात, गजानन जाधव, नितीन शिंदे, विकास मोरे आदींची उपस्थिती होती.
———श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे उल्कानगरी लोणार मध्ये लोणार, दि. २५ पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेली श्रीसंत गजानन महाराजांची पालखी आज शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारी उल्कानगरी लोणार येथे दाखल झाली. यावेळी भाविक भक्तांनी पालखीचे जोरदार स्वागत केले. यावेळी पावसातही टाळ-भूदंगाच्या गजरात वारकरी नृत्यगानात तल्लीन झाले होते. पालखीच्या स्वागताच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात, माजी नगराध्यक्ष भूषण पाटील मापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बळीराम मापारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील विरज तीर्थ घार चौकात पालखीचे लोणार नगरपरिषदेच्या वतीने पारंपरिक स्वागत करण्यात आले.यावेळी न.पा मुख्याधिकारी लोणार विभा वराडे यांच्या हस्ते श्रींची पूजा-अर्चा करण्यात आली.
वारकऱ्यांच्या ‘गजानन महाराज की जय’ घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी ठाणेदार निमिष मेहेत्रे, तसेच गणेश लोंढे, संतोष चव्हाण, शुभम कुलकर्णी, शेख समद, डॉ. अनिल मापारी, रहेमान नौरंगाबादी, सचिन गोलेच्छा, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बुधवत आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक मार्गे मार्गक्रमण करत पालखी लोणी रोडवरील द ग्रैंड विश्वनाथ माल कार्यालयात दाखल झाली. यावेळी पावसाच्या संततधारेत भक्तगण अधिक जोमाने सहभागी झाल होते.

दरम्यान, पालखीच्या सेवा कार्यात वर्षानुवर्षे समर्पितसेवा देणाऱ्या इरतकर कुटुंबीयांनी, भागवतराव इरतकर, करण इरतकर, सतीश इरतकर, कैलास इरतकर, गजानन इरतकर यांनी मुक्कामस्थळी विधिवत पूजन करून पालखीचे स्वागत केले.यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी संस्थांच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करण्यातआली होती. कै. विश्वनाथराव इरतकर कुटुंबीयांच्या वतीने पालखी मुक्कामाच्या ठीकानी भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, उद्या २६ जुलै रोजी शनिवारी सकाळी ५ वाजता श्रींची पालखी मेहकरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.

