अकोला विभाग:- गणेश वाडेकर
हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश
अकोला – हजरत सुफी फैलाने ताजुल अवलिया लंगर सेवा समितीचे वतीने यंदाही हजरत ताजुद्दिन बाबा उर्फ मुबारक 103 चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाणाऱ्या यासाठी शहरात संदलचे आयोजन करण्यात आले. तारफैल परिसरातील गाजिया मस्जिद परिसरातून निघालेला हा संदल कृषी उत्पन्न बाजार समिती, राजकमल चौक, अकोट स्टॅन्ड तिलक रोड सिटी कोतवाली चौक गांधी रोड बस स्थानक चौक टॉवर चौक वरून रेल्वे स्टेशन वर पोहोचला येथून हा संदल नागपूरकडे रवाना झाला

जेथे हजरत ताजुद्दिन बाबांच्या दरबारात हजरत सुफी फैलाने ताजुल अवलिया लंगर सेवा समितीचे अध्यक्ष मोहम्मद नासिर बाबा हुसेनी ताजिया यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली. याप्रसंगी फातेहाखानी नंतर देशात शांती व एकतेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
या संदलमध्ये तेरे सरफराज, गुलाबबाबा नक्शबंदी, जाफरबाबा, अभी लूलाई, वसीमबाबा हुसेनी पंचगव्हाण, याकूब बाबा, ताज बाबा नक्शबंदी, हनीफ बाबा नक्शबंदी, याकुब बाबा चिस्ती, मोहम्मद अनीस गाजिया, मजीत सदर, बाबुभाई कॅमेरामन, रसूल भाई कॅमेरामन, राजाभाई अदाल, सय्यद लाल, वसीम साहेब मेकॅनिकल, रज्जाक भाई ठेकेदार, शकील साहेब, समीर भाई मुंबईवाले, शहजाद भाई मुंबई वाले, नदीम भाई, शहीदभाई जवाई, अमीर, दादीस, सिराज, रजा, शेख मोईन उर्फ अनु, नंदू कदम, संतोष भाऊ उर्फ गोंडाले, मोहन भाऊ फर्निचरवाले, सचिन भाऊ पापडवाले, पत्रकार इर्शाद अहमद आदी उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर संघटक सचिव शेख रमजान शेख इमाम तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी संदल मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले?

