नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…
प्रतिनीधी: – कैलास शेलवले
मुंबई व ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सतत पडणाऱ्या पावसामुळे खबरदारीचा पर्याय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे .
तसेच जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.


