अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
रामदासपेठ पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार चार महिन्यांपूर्वी तिची ओळख तारफैलस्थित सम्यक नामदेव जामनिक (२२) या युवकासोबत झाली. ओळख वाढत गेल्यानंतर आरोपी युवकाने तिला आपल्या घरी बोलावल्यानंतर युवकाने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
प्राप्त तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे:

