अकोला विभाग प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
घराच्या अंगणात खेळणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. मोहम्मद जुबेर शेख अशफाक असे युवकाचे नाव आहे. आरोपी हा जुने कलरिंगचे काम करत होता. २३ जुलै रोजी शेजारी एका अंगणात दहा वर्षांची चिमुकली खेळत होती. अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी सदस्य दिसत नसल्याचे पाहून आरोपीने मुलीचा विनयभंग केला.
भयभीत झालेल्या मुलीने ही बाब आईला सांगितली. कुटुंबीयांनी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तातडीने युवकाला अटक केली आहे…

