रायगड जिल्हा प्रतिनिधी:-कैलासराजे घरत
जमिनीचा पैसा नाटकाचा ४० वा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी संध्याकाळी चार वाजता
हाऊसफुल झाला.
आपली सर्वांची लाडकी आगरी कोळी नायिका रंजिता पाटील आयोजित अर्चना थेटर व आगरी कोळी कला मंच भिवंडी प्रस्तुत प्रवीण पाटील (पम्म्या) लिखित, किशोर म्हात्रे दिग्दर्शित, सहदिग्दर्शक संदीप पाटील, महेश पाटील, निर्माते प्रभाकर पाटील सर, प्रवीण पाटील, संदीप पाटील, राम शिलोत्रे, नेपथ्य महेश पाटील, संगीत प्रथमेश दळवी, प्रकाश योजना संतोष नार्वेकर, गायक दयानंद तरे, शिवाजी पाटील, रंगभूषा चंदर पाटील, वेशभूषा सागर महाडिक, व्यवस्थापक दिनेश पाटील, सुरेश भोसले, विशेष सहकार्य नारायण मामा, प्रदीप तरे, मच्छिंद्र जाधव, विकास मुकादम.

जमिनीचा पैसा नाटकातील कलाकार कमलाकर पाटील, रेश्मा थले, राम शिलोत्रे, प्रमोद पाटील, श्रमिका कारभारी, महेश पाटील, सदानंद म्हात्रे, वैभव चौधरी, प्रवीण पाटील, विजय ऐनकर, प्रीती घरत, नरेश गायकर ,चेतन पाटील, रंजिता पाटील, रंजना पाटील, स्वरा पाटील, प्रणिता पाटील हे नाटक हसायला लावणारे अंगावर रोमांच उभे करणारे आणि काळीज हलवणारे नात्याची किंमत काय आहे आणि आपण पैशासाठी आपली अवस्था काय करून बसलो वास्तव्य घटनेवर प्रकाश टाकणारे समाज प्रबोधन नाटक शुक्रवार सायंकाळी चार वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे या नाटकाचा चाळीसावा प्रयोग हाऊसफुल झाला.

नाट्य रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच बहिरीनाथ कलाप्रेमी यू ट्यूब चॅनेल कॉमेडी फेम नाट्य कलाकार लेखक श्री दिगंबर कोळी, अष्टगंध कलामंच अध्यक्ष श्री अशोक म्हात्रे साहेब, हसुराम पाटील काका, पत्रकार कैलासराजे घरत, गायक जयकिसन मोकल, राहुल कोळी, गायक परमेश माळी, वैभव म्हात्रे, पापलेट फेम चिंतामणी शिवडीकर, नगरसेवक मढवी साहेब, राजेश खर्डे वेसावकर, अध्यक्ष आगरी कोळी उद्योग समूह श्री.विनोद कोळी साहेब, धवलारीन बाय सौ.अवनी पाटील, अनमोल दिगंबर कोळी
आपली सर्वांची लाडकी आगरी कोळी नायिका रंजिता पाटील आणि त्यांची सर्वं कलाकार मंडळी यांनी घेतलेली मेहनत फळास आली त्यांच्या मेहनतीचे चीज झाले.

एक हास्य, मनोरंजन आणि त्यासोबत प्रबोधनात्मक असा हा आगरी कोळी नाटकातील आजच्या घडीचा सर्वोत्कृष्ट नाटक आहे असे मत सर्व दिग्दज, कलाकार मंडळी यांनी व्यक्त केले. सर्व आगरी कोळी कराडी समाजाने नक्कीच आवर्जून हे नाटक पहा. जमिनीच्या पैशाने आपल्या समाजाची कुटुंबाची नात्यांची झालेली दुर्दशा ह्यावर अंजन घालणारे हे प्रबोधनात्मक हास्य विनोद आणि हृदय भारावून टाकणारे हे नाटक आहे.
आपली आगरी कोळी नायिका रंजिता पाटील, बोलतात ना नारी शक्ती भारी आम्ही सुद्धा कमी नाही हे सिद्ध करताना जिने नाट्य कला जपण्याचा निर्णय घेतला आहे त्या रंजिता पाटील यांनी आपल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जमिनीचा पैसा हे नाटक 18 जुलै शुक्रवारी सायंकाळी चार वाजता विष्णुदास भावे नाट्य गृह वाशी येथे स्वखर्चाने स्वमेहनतीने लावला प्रयत्नांती
परमेश्वर तिच्या प्रयत्नाला इतके यश आले की सर्व स्तरातून रंजिता पाटीलचे कौतुक होत आहे.

या नाटकास सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन्मानित पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी उपस्थित राहून रंजिता पाटील आणि त्यांच्या कलाकारांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील प्रयोगासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

