बुलडाणा जिल्हा प्रतिनीधी: – सुनील वर्मा –
आपल्या चांगल्या कार्यामुळे अधिकारीच नव्हे तर कर्मचारी व समाजात आगळीवेगळी ओळख निर्माण करून सर्वांची मने जिंकणारे बुलडाणा एसीबी येथे कार्यरत 40 वर्षीय विनोद लोखंडे यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.
बुलडाणा एसीबी मध्ये कार्यरत असलेले विनोद लोखंडे हे मूळचे सव ता. बुलडाणा येथील रहिवासी होते.सद्या ते बुलडाणा शहरातील हाजी मलंग दर्गाह जवळ राहत होते.20 जुलै रोजी ड्युटी संपवून घराकडे जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते दुचाकीवरून जिजामाता कॉलेज जवळ खाली पडले होते.
त्यांना तात्काळ शहरातील डॉ.लद्धड यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे.
ही वार्ता पसरताच बुलडाणा जिल्हा पोलीस दलात व त्यांच्या चाहत्या वर्गात दुखाचा डोंगर कोसळला आहे.

