राळेगाव तालुका प्रतिनिधी:-कविता धुर्वे
कोणतेही सरकार आले तर शेतकरी कधी सुखी दिसला नाही शेतकरी हा कर्जबाजारीच झालेला आहे . त्याचे कारण असे आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोणत्याच सरकारने हमीभाव दिलेला नाही , आणि शेतात पीक लावणीपासून तर काढणे पर्यंत होणारा खर्च अमाप असल्याने त्याच्याकडे कुठलीच पुंजी उरत नाही या उलट बँकांकडून खाजगी सावकारांकडून काढलेल कर्ज त्याला दरवर्षी भरावे लागत त्यातच आपला कुटुंबाचा वाढता खर्च हेही त्याला झेपावणारा नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याने त्याने मृत्यूला कवटाळले आहे .
आणि म्हणूनच शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे .सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे सातबारा कोरा करावा शेतकरी कर्जमाफी व मेंढपाळ मच्छिमार शेतमजूर कामगार दिव्यांग कष्टकरी यांचे प्रश्न घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक २४ जुलै रोजी ११ वाजता तालुक्यातील वाढोना बाजार येथे शेतकऱ्यांनी वडकी राळेगाव रोड जाम करून शांततेच्या मार्गाने चक्काजाम आंदोलन करण्यात केले.

यावेळी आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष्याचे तालुकाध्यक्ष संजय दुरबुढे, राष्ट्रवादी शरद पवार, गट तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, शिवशेना, उद्धय ठाकरे, गट जिल्हा उपाध्यक्ष विनोद काकडे राहुल बहारे, चंद्रकांत झाडें, नगरसेवक मधुकर राजूरकर, सैयध लियाकतअली, श्याम धुर्वे, दिनेश करपते शेखर अंबाखाये, प्रमोद अमृतकर, जितेंद्र काहूरके, मधुकर पावले, प्रमोद ढाले, सुनील पाटिंग, बादल देवतळे, प्रदीप गुजरकर, किशोर गलाड विष्णू तोडासे, प्रवीण काकडे, रमेश पेंदाम, संतोष तेलंगे, विलास देशमुख, अण्णा अंजीकर प्रफुल आत्राम, संजय भोरे, रुपेश कोठारे, नितीन कमेटवार, लिहास आग लावे अंकुश मुनेश्वर,किशोर धामंदे, प्रकाश पोपट, प्रहार जनशक्ती पक्षाचे संजय गुरनुले,जीवन गोहोकार, नरेंद्र झिले यांचेसह दिव्यांग बांधव व विविध पक्षाचे नेते शेतकरी उपस्थित होते.

