मुंबई प्रतिनीधी :(सतिश वि.पाटील)
महिलांचे कपडे परिधान करत 41 लाखांची चोरीमुंबईतील मलाडमध्ये शक्कल लढवून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. चोर हा दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायला यायचा.
या हुशार चोराने मुंबईतील मलाड, कांदिवली, बोरिवली आणि दिंडोसी भागामध्ये अनेक चोऱ्या केल्या.
मुंबईतील मलाडमध्ये महिलेच्या वेशात चोरी करणाऱ्या चोराला अटक

मलाड, कांदिवली, बोरिवली आणि दिंडोसी भागामध्ये अनेक चोऱ्यांचा होता आरोप
मुंबईतील मलाडमध्ये शक्कल लढवून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. चोर हा दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायला यायचा. या हुशार चोराने मुंबईतील मलाड, कांदिवली, बोरिवली भागामध्ये अनेक चोऱ्या केल्या आहेत.
चोरी करताना चोर दररोज शक्कल लढवायचा. हा चोर रेल्वे स्थानकातील आसपासच्या भागामध्ये चोरी करायला यायचा. सीसीटीव्हीत आपली ओळख पटू नये म्हणून तो चोरी करताना रेल्वे ट्रॅकवर जाऊन महिलांचे कपडे परिधान करायचा. चोरीनंतर तो पुन्हा रेल्वे ट्रॅकवर यायचा आणि परिधान केलेले महिलांचे कपडे काढायचा. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन तिथून पळ काढायचा.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी चोराचे नाव हे रणजीत कुमार उर्फ मुन्ना असे आहे. बिहारमधील खगरिया जिल्ह्यातल रहिवासी आहे. आरोपींकडून 36 तोळे हिरे जडवलेले सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी आणि 13 लाख बँक ठेवी रक्कम, सोने वितळवण्याचे यंत्र, छिन्नी हातोडा सर्वकाही जप्त करण्यात आलं आहे.
चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत ही तब्बल 41 लाख रुपये रक्कम आहे. शिवाय त्याने बिहारमधील जमीन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये आणि मालवणीत घर खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपये दिले होते. मालाड पोलिसांनी सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात मालाड पोलीस हे मार्चपासून चोराचा शोध घेत होते. महिन्याभरापूर्वी मालाड पोलीस ट्रॅकवरील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत होते. 100 ते 150 सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी महिलांची कपडे परिधान केलेला दिसला होता.
हेही वाचा : वहिनीचं तोडलेलं मुंडकं हातात घेऊन फिरत होता गावभर.. दीर नव्हे सैतान!
दरम्यान, मुंबईमध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ निर्माण होऊ लागली आहे. मालाडमधील इतर काही ठिकाणी या चोरीच्या घटना घडल्या आहेत. तपासादरम्यान, आरोपी महा मालवणी येथे जाताना दिसला. मालाड पोलिसांनी मालवणीत सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या अटकेमुळे एकूण 8 गुन्ह्यांचा गौप्यस्फोट झाला.

