रायगड जिल्हा प्रतिनिधी:-कैलासराजे घरत
उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली Uran Education Society, School & Jr.College Uran च्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमीटीची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक श्री.विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली,
या निवडणुकीसाठी १ली ते १२वीचे पालक प्रतिनिधी आणी शिक्षक व मुख्याध्यापक (प्रिन्सिपल)उपस्थित होते सदर त्यानी श्री.विकास कडू यांना बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले, विकास कडू यांनी आगोदर आर के फाउंडेशन jnpv मध्ये हि बऱ्याच वर्ष पालकांचे प्रतिनिधित्व कडून PTAउपाध्यक्ष, सेक्रेटरी ह्या पदावर काम केले आहे त्यांच्या पालक प्रतिनिधी म्हणून वेगळाच ठसा निर्माण झाले आहे.

श्री. विकास कडू यांचा थोडक्यात परिचय ते रायगड जिल्हातील नामांकित चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड चे संस्थापक, अध्यक्ष आहेत त्यांनी जवळ जवळ उरण आणी रायगड जिल्हातील अनेक तालुक्यामध्ये ९ वर्ष समाजसेवेची कामे केली आहेत त्याची पावती म्हणून त्यांना समाजाने अनेक पुरस्काराने सम्मानित केले आहे. श्री.विकास कडू म्हणाले की मी सर्व UES URAN च्या सर्व शाळेच्या व ज्युनियर कॉलेजच्या पालक प्रतिनिधी व शिक्षकांचे आभारी आहे.
की त्यानी माझ्यावर विश्वास ठेवून बिनविरोध पालक शिक्षक संघांचे उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणी मी शाळेसाठी व कॉलेजसाठी पालकांच्या सेवेसाठी सदैव उभा राहणार आहे असे मत व्यक्त केले.
विकास कडू यांची UES URAN येथे PTA उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे समजताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

